वा द ळ 1 नसतेच वादळाला संस्कृती, परंपरा किंवा नातं ---! असतं ते चार असामाजिक तत्त्वांनी संधीचा लाभ घेत एकत्र येणं ! आणि---- जे मिळत नाही, --- जे तयार करता येत नाही, --- ते सगळ्यांनी मिळून ओरबाडणं! मला नाही तर -- तुलाही नाहीचं एक भणाण थैमान नुसतं, ओरबाडलेल्याचाही उपयोग करण्याची क्षमता नसणं ! आक्रमण, हिरावून घेणं, हीच धारणा --- हीच शिकवण ----! नसतच कुठलं सुजाणपण! असतो त्याला फक्त एकच डोळा सर्वांवर रोखलेला, हृदयात हलाहल आणि वरवर शांतीचा पुरस्कार करीत समृद्ध किनारे शोधणारा! तिथे थैमान घालण्यासाठी मनातून आसुसलेला ! नसतात वादळाला मुळं, पानं, फुलं, फळं ---, नसतच माहीत त्याला एकमेकांना अन्न-आधार देतं – गगनावरी वेलु चढवणं ! मूळांनी खोडाला, खोडानी फांद्यांना ---- फांद्यांनी पानाफुलांना सुखावणं ----सजवणं! परत पानांनी सगळ्यांना अन्न देत जगवणं नाहीच पटत वादळाला एकमेकांच्या -- खांद्यावर मान टाकून विसावणं ! नाहीच भावत त्याला शांतीप्रस्तावाचं बोलणं माहीत असतं त्याला फक्त मुंड्या मुरगाळणं! ...
Comments
Post a Comment