पाऊस
पाऊस
(8:8 / 8:3)
पाऊस आला पाऊस आला
धाउन आल्या सरी
आनंदाच्या
खिरापती
हा
वाटतो घरोघरी ।।
दूरस्थित पुत्रासी बघण्या
जव नयन आसुसती
तसेचि सारे वाट पाहती
डोळे लावुन तुझी
।।
कवेत घेई वृद्ध पित्यासी
पुत्र जसा यशवंत
देत दिलासा
घेउन जवळी
नका होऊ चिंतीत ।।
तसेच सार्या
सृष्टीला
तू
घेसी सुखद
मिठीत
आलो आता कशास चिंता
रहा सर्वजन स्वस्थ ।।
-------------------------
लेखणी अरुंधतीची -
Comments
Post a Comment