प्रियांगी / प्रियमोहर / (Tabebuia rosea)
प्रियांगी / प्रियमोहर / ( Tabebuia rosea) हल्ली प्रत्येक कार्यक्रमाला संकल्पना असते. Theme असते. तशी पौष - माघ म्हणजे जाने-15 ते फेब्रु -15 ह्या महिन्यात निसर्गाने गुलाबी रंग आपल्या Theme मधे घोषित केला असावा. सध्या रस्तोरस्ती देशी गुलाबाच्या रंगाचा टाबुबीया ( Tabebuia rosea) फुलला आहे. रोज वाहनांच्या प्रदूषणाने धूळभरल्या थंडीत काड्यामोड्या झालेल्या, गर्दीत लपलेल्या, ह्या निनावी वाटणार्या झाडांनी जानेवारीच्या मध्यापासूनच स्वतःचे रंग दाखवायला सुरवात केली आहे. नको ते नाही तर, सुंदर आकर्षक गुलाबी! गावठी गुलाबाचा गुलाबी! मनाला सुखावणारा त्याचा गुलाबी रंग पाहून निसर्ग निष्पर्ण कडाक्याची थंडी संपल्याचं घोषित करून गुलाबी थंडीची सुंदर वातावरण निर्मिती (Ambiance) करतोय असं वाटलं. आजूबाजूचा परिसर मनाला गोड वाटेल असा करतोय. गुलाबी फुलांनी बहरलेल्या, नाजुक देखण्या तरुणी प्रमाणे दिसणार्या ह्या तरुवराचं त्याच्या नावाशी काही विसंगत नातं आहे असं वाटलं. खर तर आपण कानांनी पहात असतो. डोळ्यांनी ऐकत असतो. स्पर्शाने बोलत असतो. बोलण्यातून स्पर्शतो. नाकाने ठरवतो; आणि बुद्धीने हुंगत...