ओढ अनामिक
ओढ
अनामिक
कुणी
घेतले, नाम तयाचे, विषया विषयातुनी
सळसळली
अन, अंगामधुनी, माझ्या सौदामिनी
हुरहुर
कसली, लागे मजला, कळे न रात्रंदिनी
चित्र
तयाचे, पाहु लागले, मनात रेखाटुनी
असेल
कैसा, मनास चाळा, बुडले मी चिंतनी
धसमुसळा
का, दयार्द्र स्नेहल, प्रतिमेतुन कल्पुनी
आलिंगन
का, देता त्याने, मिटतिल नेत्र सुखानी
धास्तावुन
का, पाहिन त्यासी, डोळे विस्फारुनी
खांद्यावरती,
हळुच टेकविन, माथा सांभाळुनी
जाइन
का मी, मिठीत विरूनी, घेइल का समजुनी
हृदयाची
का, शमेल धडधड, नेता मज उचलुनी
फरपट
का होईल निरंतर, भय-सुसाट वेगानी
कधी
ओढ तर, कधी भयाने, सरती किती रजनी
कितीक
रात्री निद्रादेवी, गेली मज सोडुनी
परि----
ओढ
अनामिक, मला बोलवे, क्षितिजापार रानी
अलगुज
त्याचे हितगुज करते, उठवी स्वप्नातुनी
ही
कुठली ताकद खेचून नेई मजला त्याच्यापाशी
वळुन
पाहिना गाव पुन्हा मी, परका वाटे मजसी
---------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
Comments
Post a Comment