कडुनिंब 2
कडुनिंब 2
झरझर झरल्या पाउस रेघा त्यात उभा कडुनिंब
पसरुन कर तो झेलत धारा होत असे बहु चिंब
तरु लव लवता, वाकुन फांद्या, ओघळती जल थेंब
झिलमिल जल ते वाहत जाता त्यात दिेसे प्रतिबिंब
पवन पुसत जाई भिजलेले ओलसरी तरु अंग
तिरिप क्षणभरी येत उन्हाची सोनसरीं सम रंग
खुदु खुदु खुदु तो हासत फांद्या नाचवि वायुसवेच
सुख सुख अजुनी काय म्हणावे हा तर श्रीधरसंग
---------------------
लेखणीअरुंधतीची-
Comments
Post a Comment