भाऊ

 

भा

काळाचा झपाटा विलक्षण असतो. आत्ता आहे आहे म्हणणारी माणसं दुसर्‍या क्षणी झुमकन उडून जातात. ``क्षण तो क्षणात गेला’’ दचकून स्वप्न संपल्यासारखी जाग येते. काही काळ स्वप्नाचा अम्मल राहतो. मनाची पाटी स्वच्छ कोरी होऊन जाते.

 

एका छोट्याशा सुंदर बालपणी

एक भाऊ होता मला

हसायला खेळायला बागडायला

त्यानेच शिकविले मला

 

हातात हात गुंफुन आम्ही

नाचलो कितीतरी

गिरक्या घेत स्वतःभोवती

फिरलो कितीतरी

 

घेरी येउन थांबलो आणि - - -हात

सुटले कधीतरी

गिरक्या घेत स्वतःभोवती आम्ही

पोचलो 'कुठेतरी'

 

फिरून हात गुंफण्यासाठी, मी ---

हात पुढे केले

अंतर एवढं वाढलं होतं की , हात --

अधांतरीच राहिले!

 

------------- अधांतरीच राहिले!!!


------------------------------------------------------

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

sip your Coffee-

कडुनिंब 2