कांचन -

कां -

पाऊस ओसरता ओसरता फुलणारा उंचापुरा गगनचाफा (बूच) आकाशाला भिडायला निघाला असता; पानाफुलांची पसरट छत्री असलेली, थोडीशी ठेंगणी  कांचनची झाडं आकर्षक गुलाबी कधी लाल, कधी दोन रंगांचे मिश्रण तर कधी जांभळट तर क्वचित पांढर्‍या मोठ्या फुलांनी बहरून आली की गार्डनची फुलाफुलांचे प्रिंट असलेली छानशी साडी नेसलेली एखादी रमणीच माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. धीरगंभीर गगनचाफ्याच्या शेजारी फुललेली श्रीमंत कांचन ही जोडी जराही विजोड न वाटता मनाला प्रफुल्लित करून जाते.  

लाल, गुलाबी, निळी जांभळी

फुलाफुलांची नेसुन साडी

पदर घेउनी हातावरती

उभी नार का जणु बाजिंदी-----1

दावित  अबलख रंगसंगती

रंग फुलांचे आकर्षक अति

जाणार्‍यांच्या नजरा वेधुनि

सहज घेतसे कांचन सजुनी ------2

जशी नर्तकी तीन ठिकाणी

मोहक मोहक तनू वाकवी

तसे तरूचे वळण पाहुनी

तिला पाहण्या थबके कुणिही ------3

निघे कामिनी सजुनी धजुनी

अवचित सर ती येइ धावुनी

चिंब होतसे जैसी रमणी

दिसे तशी ही कांचन भिजुनी ------4

घरंदाजपण शोभे तिजला

अलंकारयुत सुहास्यवदना

कुसुमांनी बहरताचि वाटे

स्वर्गातुन अवतरे अप्सरा ।।------5

जणु शाखा ह्या लववुन खाली

नमन करितसे कुणी नर्तकी

स्पर्श करोनी वसुंधरेसी

वाहे पुष्पांजली रम्य ती ------6

--------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते