मोगरी –
कसा मोगर्याचा तोरा, सार्या फुलांहून
न्यारा
घेती माघार तरु लता, ह्याचा दिमाख पहा
जरा
अहो निदाघात उतरता, सार्या फुलांचा
चेहरा
नित आसमंती दुमदुमे, सुघोष ‘‘मोगरा
मोगरा’’
जशी शुक्राची चांदणी, शोभे नभाच्या
अंगणी
तशी पानांच्या कोंदणी, डोले मोगरी हिरकणी
धरुनिया पवनाचा हात, परिमल झोकात झोकात
उतरे नासिकेचा घाट, हृदी बैसता काय
थाट
जरि घातली आभूषणे, हिर्या मोत्यांची
काकणे
एकमेकास विचारती, ‘‘माळला मोगरा कोणे?’’
-----------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
माघ कृ. षष्ठी, 19 फेब्रु. 2025
Comments
Post a Comment