सुहृत् भेट


सुहृत् भेट


गंगा यमुना पुण्य-मोक्षदा । कृष्णा गोदा सुखद नर्मदा

घेउन येती किती संपदा । पित्याकडुन त्या नित्य नवविधा

 

अर्पण करती जलधीला ह्या । अविरत अविरत नदी नद्या हया

सामावुन घेईच तयांना । रत्नाकर ऐश्वर्यवंत हा

 

जलचर सृष्टी भूषण सलीला । समृद्धी ही असीम अतुला

पुत्री ह्याची असेच कमला । कमी कशाची असे जलधिला

 

पुत्र पुत्रि वा असो कामिनी । वैभव पाणी भरते सदनी

झुरतो सागर परी अंतरी । हृदय होतसे पाणी पाणी

 

कुणा भेटिची ओढ असे त्या । आसुसला भेटण्यास सुहृदा

सुहृदासम संतोष जिवाला । नसे भूवरी अजून कुठला

 

जरा जवळ येताच चंद्रमा । उचंबळे जलसम्राट पुरा

चंद्र बरसवी अमृतधारा । मैत्र अनावर कैसी मधुरा

---------------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते