आई

 

 म्हातारी

 

म्हातारी कोतारी

एक होती आई

मरणाची तिच्या

घरादारा घाई ।। 1

 

मुलीला तो हवा

दागिन्यांचा डबा

लेक सांगे साऱया

घरावर ताबा ।। 2

 

नको म्हणे सून

शिस्तीचा बडगा

द्यावा आता तरी

किल्यांचा जुडगा ।3

 

आई धरी मौन

मुखी राम राम

हातानी ग काम

हाची नित्य नेम ।। 4

 

किती केले कष्ट

तरी मुले रुष्ट

सून चरफडे

सासू धष्टपुष्ट ।। 5

 

सून म्हणे मरो

म्हातारी म्हातारी

मिटो कटकट

ही जन्मभरीची ।। 6

 

देव उभा पुढे

राहिला दोघींच्या

``तथास्तु'' म्हणोनी

अदृष्य ही झाला ।। 7

 

आनंदाने वेडी

डोकावे दर्पणी

सून म्हणे आता

मरेल थेरडी  ।। 8

 

दचकली सून

पाहता दर्पणी

ठिकर्‍या ठिकर्‍या

सांडल्या भूवरी  ।। 9

------------------------------------------------------

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते