सरिता `रामाकृती' -
सरिता `रामाकृती' -
नदी एक आहे अलौकीक मोठी
तिचे नाम `रामाकृती'
हे असेची
नसे निम्नगा ही असे उर्ध्वगामी
सदा नेतसे `सौख्यशृंगी' गिरीसी ।। 1
मुखाकाश दाटे सुनीलाकृतींनी
किती दिव्य रामाकृतींनी
कृतींनी
मुखी रामनामावली
मेघ येता
सुवेगेचि ओथंबुनी थोर जेंव्हा ।। 2
सुखे वर्षती नेत्र आनंद धारा
मनाच्या तलावा महापूर येता
सुखाच्याच लाटांवरी सौख्य धारा
अहा नाचती खेळती पद्मगंधा ।। 3
उफाणेचि वेगे जगा सर्व व्यापे
दिसेनाचि रामाकृतीवीण
कैसे
सुखाची नदी ना मिळे सागरासी
स्वये सौख्यसिंधूच `रामाकृती'ही ।। 4
मनाच्या तलावी हिचा जन्म झाला
म्हणोनी मना शोधु लागेचि जेंव्हा
मला सापडेना कुठे मीच आता
कुठे बिंदु मी? रामसिंधूच
आता ।। 5
जसे काष्ठ होई स्वये अग्निरूपी
जळी मीठ का वेगळे राहतेची
तसे विश्व माझे मनाच्यासवेही
विरोनीच
`रामाकृती' माजि जाई ।। 6 ।।
---------------------------------------------------------
लेखणी अरुंधतीची -
Comments
Post a Comment