मधुमालति
मधुमालति
झरझर चढते वरवर वेली
फुलाफुलांनी नटली सजली
धवल गुलाबी लाल फुलांची
दाटी वेलीवरती झाली
काल धवल तर आज गुलाबी
उदया फुलांवर दाटे लाली
अधोमुखी मधुमालति गाली
कांती लावण्याची चढली
खिडकीमधुनी घरात बघते
वाकुन झोके घेत वल्लरी
मंद सुगंधचि बोलविण्या ये
तुला भेटण्या सखी थांबली ।।
-------------
Comments
Post a Comment