गावे सुभाषितांची

 

गावे सुभाषितांची

 

पाहून शोक माझा, हासेचि दुःख गाली

लिहिलाच शोक आहे, वदले तुझ्याच भाळी

 

मी ढाळताच अश्रू, आली तया झळाळी

कुजताच स्वप्न माझे, आली तया नव्हाळी

 

मी उन्मळून पडता, बळकटी त्यास येई

मी धाय धाय रडता, ते स्वप्न गोड पाही

 

जेंव्हाच संतवचनी, रुचि लाभली सुवेळी

मी हासताचि दुःखा, पळुनीच दूर गेली

 

आता उसंत नाही, दिसलीच वाट माझी

क्षितिजे उन्हात हसली, गावे सुभाषितांची

------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते