अभिमन्यू
अभिमन्यू
जातांना रोजचि दिसतो । तरु उमदा एक उभा तो
सळसळती पाने त्याची
। तो स्वप्न
उद्याचे
बघतो --- 1
लखलखती तांबुस
वर्णे । नाचती प्रकाशित
पाने
जणु लाल कोवळे तळवे । हलवून गुणगुणे
गाणे
--- 2
``ये खेळाया ये बाले । हलवून हात तो बोले''
कारंजे आनंदाचे
। तो, वृक्ष हवेवर डोले
--- 3
किति वादळवारे
येती । नच माहित याला भीती
घुसळून अंग हा घुमतो । कोसळतो
धो धो हस्ती
--- 4
कडकडा कडाडे बिजली । मुख प्रसन्न
ह्याचे
उजळी
जणु चक्रव्यूह
भेदाया
। अभिमन्यू
सज्ज सकाळी
--- 5
रोजचा मार्ग तो माझा । मी रोज तया न्याहाळी
परि आज घडी ही नव्हती
। असतेच जशी दरवेळी
--- 6
का भवती त्याच्या गर्दी
। जमली सार्याच
बघ्यांची
फुकटात तमाशा बघण्या
। वाटे मरण मेजवानी
--- 7
कुणि कभिन्न
काळे प्राणी
। निरखिती
तया जवळूनी
दोरांची घेउन जाळी । करित चक्रव्यूह
मांडणी
--- 8
फांदीवर फेकुन फासे । जखडती चहूबाजूंनी
कुणि अंगावरती
त्याच्या
। उन्मादे
जाय चढोनी
--- 9
घालति सपासप ते घाव । तरु घायाळ उभाचि वीर
`डगमगलो नाही चित्ती' । धरणीला म्हणतसे धीर --- 10
ते रूप तयाचे पाही । विचलीत
मने मी जाई
कामाची घाई मजला । भेटीन तुला सांजेसी
--- 11
होताच सांज मी धावे । बघण्यासी
तरूवर तेथे
हे काय काय मी बघते । नयनी नीर पूर वाहे
--- 12
मज उजाड दिसली धरती । भगभगीत
नभ ते वरती
बोडक्याच आकाशाचे
। केश रेशमी का सरती --- 13
धरणीवर तुडवित
त्याचे । ते लाल कोवळे तळवे
किती जयद्रथ
ते जाती । अपमान न त्याचा
बघवे
--- 14
लादुन त्या गाडीवरती । घेऊन तयाला जाती
प्रतिज्ञेविना पार्थाच्या
। तो वीर चालला अंती --- 15
रुतलेले माती मध्ये । रथचक्रचि
अभिमन्यूचे
मज दिसले त्यावर
माझे । मी हात ठेऊनी वदले
--- 16
केलीस शर्थ तू बाळा । निधड्या
छातीने
लढला
--- 17
परि माणुस कपटी मोठा । अभिमन्य़ू
न कळे त्याला
श्रीहरिचा तू जरी प्राण । जरी पार्थाचा
तू त्राण
येताचि काळ चकवूनी । गळे नात्यांचे अवसान
--- 18
--------------------------------------------
लेखणीअरुंधतीची
-
Comments
Post a Comment