पावसाचा थेंब
पावसाचा थेंब
पाण्याचा थेंब सानुला
ढग्गुच बोट धरून निघाला
वार्याशी मस्ती करीत
आकाशी उंच उंच चढला ।।
दोन्ही हात उंचावत
पानं म्हणाली
ये खेळायला
लग्गेच ढगाचं बोट सोडून
उड्या मारीत खाली आला।।
पानापानांवर नाचला
खेळला आणि लोळला
पानांचीच गादी करून
तिथेच झोपी गेला ।।
वार्यानी हलकेच झोका दिला
थेंब खाली ओघळला
काळ्या आईने पदर पसरून
हलकेच कुशीत घेतला ।।
माय लेकाची
भेट पाहून
ढग खळाळून
हासला
काम झालं फत्ते म्हणत
घरच्या वाटे निघाला ।।
-------------------------------------
Comments
Post a Comment