अहंकार

 

अहंकार


सावली सारखा अहंकार

मला नेहमी सोबत असतो

कसा दूर लोटू त्याला

जो इमानदारीने साथ देतो?

 

सोडून जाते सावली सुद्धा

जरा प्रकाश संपला तर

अंधारातही ह्याची साथ

असते नित्य निरंतर--!

-------------------------

#लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते