फणस

 

फणस तरूच्या अंगांगावर

हे बाळ फणस लोंबले

मज विठुमाई आठवे

 

कुणी लोंबते, कुणी रांगते,

कुणी झोंबे लडिवाळ

विठुमाई मज सांभाळ

 

घे मजला घे उचलुन तू गे

कटिखांद्यावर माऊली

जणु संतसभा बोलली

 

काटेरी फळ, छबी अजागळ

परि गोड मधुर आतुनी

ही किमया तुझी जननी

 

खाली खायी खोल असे गे

परि चिंता ना लव मुळी

उभी विठाई राऊळी

------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

वादळ 1

कडुनिंब 2