कोय

 

कोय

रसाळ जीवन आम्रफलासम

अवीट गोडी त्यात शिगोशिग

मधेच राही बीजरूप परि

`मी माझे' ची कोय कठीणतर।।

जरी चाखले जीवन अमृत

मजा कोयिची जटिल गुत्यांत

दातांची फणि काढी विंचरुन

`मी माझे' ची ये मौज विलक्षण।।

----------

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते