गुलाबी

 

गुलाबी

8:8:8:7

एक गुलाबी हळूच फुलला

नवजात शिशूच्या गाली गं

 

एक गुलाबी हळूच हसला

नव तारुण्याच्या ओठी गं

 

एक गुलाबी मनी बहरला

 मिळताचि नजर नजरेला गं

 

एक गुलाबी नभी पसरला

जलदांवर किति कोमलसा गं

 

प्राचीवरती एक गुलाबी

तो जीवनदान सोहळा गं

 

एक गुलाबी गुलाबकलिका

स्पर्श कोवळा यमुनेला गं

 

तोच गुलाबी कालिंदीला

नित अंग अंग मोहरवी गं

 

रौद्र रूप ते विसरुन गेली

पथदर्शीला पथ देई गं

------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते