उद्दिष्ट
उद्दिष्ट
प्रवाहासवे
वाहती काटक्या ह्या
कुणी
ह्या तरूच्या; कुणी त्या तरूच्या
कुणी
वाळलेल्या, कुणी मोडलेल्या
गळाल्याच
ज्या भार वृक्षास झाल्या ----- 1
तरू
सोडता व्यर्थ झाले जिणे ते
असो
येथ वा तेथ बेवारसाचे
जळाची
दिशा, वेग वा भोवर्यांनी
कधी
वाहती वा किनार्यास येती ----- 2
न
राहे तयांसीच उद्दिष्ट काही
न
अस्तित्त्व त्यांचे कुणा मान्य होई
मतीला
असे पायबंदी जळाची
प्रवाही
पडे त्या गती ना स्वतःची ----- 3
परी
पाणपक्षीच चोचीमधूनी
तयांसीच
एकेक गोळा करूनी
निवारा
करी पाणवेलींवरी त्या
जळी
भासती बेटुली पाचुची ज्या ----- 4
तरंगे
तरंगांवरी तो निवारा
सदा
ओंजळी घेऊनी पक्षिबाळा
तयांच्याच
छोट्या पदाने सुखावे
पसाराच
तो वाळल्या काटक्यांचा ----- 5
कशा
पाणवेली, कुठे काटक्या त्या
तिरस्कार
ज्यांचा जगानेच केला
नवा
अर्थ त्यांच्या मिळे जीवनासी
घडे
देखणी काटक्यांची हवेली ----- 6
-------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित
माघ कृ. चतुर्थी 16 फेब्रु.2025
Comments
Post a Comment