जात

 

जा

 

जात माझी फुलांची

प्रकाश पाहून उमलायची

 

जात माझी चांदण्यांची

मंदमंद बरसायची

 

जात माझी पक्षाची

मोकळ्या आकाशात उडायची

 

जात माझी वार्‍याची

गंध पसरवित जायची

 

जात माझी मधमाशीची

कण कण टिपण्याची

 

माझी जात ढगाची

बरसून मगच संपायची

----------------------

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते