हे राष्ट्रदेवते भारतमाते
हे राष्ट्रदेवते भारतमाते
हे राष्ट्रदेवते भारतमाते
चैतन्य प्राण तू वसुंधरेचे
तू अमृत देसी जगास अवघ्या
जरि कालकूट तव नशिबी
आले ------- १
संसार दुःख जे अचूक भेदे
जे संकट-सागर पार करविते
तू अमोघ गीता-
कर्मशस्त्र ते
देऊन जगता बहु कृतार्थ
केले ------- २
कर्तव्य पथावर अढळ राहिले
जे अधर्मासवे नित्य झुंझले
आदर्श स्थापिले श्रीरामकृष्ण
ते
नित मानबिंदु जे सद्धर्माचे-------
३
दे सामान्यासी असामान्यपण
जे नीतीचे नवनीत खरोखर
रणनीतीचा जो अपार सागर
पंचतंत्र देसी ते बहु दुर्लभ-------
४
तव शिल्प शास्त्र वा शल्य शास्त्र वा
वा शास्त्र रसायन अमूल्य
ठेवा
योगाचा दिधलास वारसा
तू विज्ञानाचा दीप
प्रखरसा------- ५
तू वसुंधरेचे हृदयस्थान
गे
तव स्थान कुणी का घेऊ
शकते?
जरी जाळीले तुज यवनांनी
त्या
तव सुवर्णकांती तरिही
झळके-------६
तू जगता शिंपुन प्राण
रसाने
करिसी सरसोत्सव जगती
माते
तव गत वैभव गे
पुन्हा मिळवुनी
जगद्गुरूच्या तुज बसवू स्थानी -------७
-------------------------------------------
सौ. अरुंधती दीक्षित -
Comments
Post a Comment