सोनचाफा
सोनचाफा
भृंगमोही सोनचाफा
सवे सुगंधाचा ताफा
फिरत राही “बेवफा” हा
करुन वार्याचा तराफा --- 1
दोन द्वारे पापण्यांची
हलकेच टाकी मिटवुनी
नजरेचिया लव ना पडे
नजरेस हा तो लवभरी ---2
श्वासरज्जुवरुन उतरे
हृद्महाली आमोद रे
नेतसे अनमोल मन हे
त्याच्यासवे त्याच्यासवे ---3
----------------------
Comments
Post a Comment