आकाशाचे रंग

 

आकाशाचे रंग

 

रंग सांडले आकाशात

उचलुन घेतले मी मनात

भरून पाहता जीवनात

हरखुन गेले मी मनात।।

 

जीवनाचं चित्रच बदलून गेलं --

 

लाल केशरी सूर्य नटला

सोनेरी किरणांनी सजला

मुलायम गुलाबी ढगांचा

सुंदर गालिचा अंथरला।।

 

पावसाच्या धारांवरती

इंद्रधनुचा पुल बांधला

चंद्रकोर हा झुला टांगला

चांदण मांडव नभी घातला।।

 

नक्षत्रांची झुंबरं केली

नवग्रहांची तोरणं बांधली

आकाशाची गहिरी निळाई

जीवनात चित्रित झाली।।

 

मी पणाचा मळकट रंग

आकाशगंगेत वाहून गेला

आकाशाएवढा तुकाआज

क्षणभर जीवनात अनुभवला।।

-----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments