श्यामरंग

 

 श्यामरंग

 

ज्ञानोबाचा एक रंग

तोची तुक्याचा अभंग

जनी झाली त्यात दंग

नामा झाला हो निःसंग ।।1

 

तोच एक श्यामरंग

उजळवी अंतरंग

मीराबाईस लाभला

लाभावा तो कृष्णसंग ।। 2

 

नाही स्वप्नांचे जंजाळ

नाही मनाचा गोंधळ

एका एका अभंगाने

मन स्थिरावे सकळ ।। 3

 

सुखदुःख समांतर

नित्य माझ्या बरोबर

मिटो त्यातील अंतर

आस हीच निरंतर ।। 4

 

संपो दुःखाचा आवेग

शांत सुखाचे तरंग

भेटो मज एक वार

संतसखा पांडुरंग ।। 5

 

नाही मीरा नाही जनी

ओढ एक माझ्या मनी

मनमोहन पहावा

सार्‍या जनी माझ्या मनी ।। 6

 

पार्थाचा जो पाठीराखा

घडविले त्याला ज्यानी

नित्य रहावा हृदयी

तो योगिराज महाज्ञानी ।। 7

------------------------------------

जाने 20002

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते