सुंदर झाले जग सगळे

 

सुंदर झाले जग सगळे

 

मंद धुंद मृद्गंध दरवळे

पारिजात सुकुमार परिमळे

तगर डवरली तार्‍यांनी ही

सुंदर झाले जग सगळे ।।

 

तारांवर जलमोति सरकती

बघ जलात जग प्रतिबिंबित हे

जुने टाकुनी वृक्ष वि हे

सुंदर झाले जग सगळे ।।

 

गंधित जग हे धुंदित जग हे

किति रंगित जग हे सदा नवे

सुमधुर संगित ऐकू येते

सुंदर झाले जग सगळे ।।

 

पाण्यामधुनी वार्‍यावरुनी

कणाकणातचि चैतन्य नवे

दैन्य दुःख विसळले जलाने

सुंदर झाले जग सगळे ।।

 

मरगळ गेली धुवून पुरती

अप्रूपचि हिरवाईचे  हे

धरुनी आशा उरी नवी ही

सुंदर झाले जग सगळे ।।

---------------------------

#लेखणीअरुंधतीची

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते