हिरवा ऋतु

 

हिरवा ऋतु

बटाट्यांवर हिरवे पाचू जडवून, गेला हिरवाऋतु

रताळ्यावर लाल माणिक ठेऊन, गेला वर्षाऋतु

कांद्यावर हिरवा तुरा खोचुन, गेला हिरवाऋतु

लसणाला पांढरी दाढी लावून, गेला वर्षाऋतु 1

 

आळशी आळी फ्लॉवरमध्ये निजवून, गेला वर्षाऋतु

कोयीलाही मजबूत पाय देउन, गेला वर्षा ऋतु

खिडकीमध्ये भिजका कावळा, ठेऊन गेला वर्षाऋतु

चूप म्हणून कोकीळेला , दटावून गेला हिरवा ऋतु 2

 

धूळ-भरल्या सा र्‍या जाळ्या धुवून गेला वर्षाऋतु

गॅलर्‍या, सज्जा, खिडक्या, दारे स्वच्छ करून गेला ऋतु

उमटवित पाय घरभर ओले, नाचून गेला वर्षा ऋतु

कपड्यांनाही हात ओले, पुसून गेला वर्षा ऋुतु 3

 

पागोळ्यावर पाय हलवीत तरुबाळ ठेउन गेला ऋतु

भींतींवरती हिरवी मखमल, जडवुन गेला हिरवा ऋतु

 

देता सुट्ट्या शाळांना हा, हसत पसार झाला ऋतु

करून गेला खोडकरपणे, छत्र्या उलट्या वर्षाऋतु

दाणादाण सर्वांचीच उडवून गेला वर्षाऋतु

जातो म्हणून  निरोप घेत, फसवून की हो गेला ऋतु!  4

------------------------

 

Comments