- शारदाम्बा -

 

शारदाम्बा -

 

जैसीच चाल माझी  तैसेच वृत्त चाले

लकबेसवेच माझ्या ते वृत्तबद्ध डोले

 

बघुनीच चाल माझी ऐटीत चालणारी

जोडून हात दोन्ही पुढतीच शब्द येती

 

कोशातुनीच सगळे नटुनी अलंकृता ते

नमुनी मलाच म्हणती ``आम्हीच तत्परू गे

 

ह्या किंकरांस द्यावा आदेश  तो खुणेनी

करतील लेखणीने जादूच कोणतीही

 

होईल लेखणीची तलवार तेज ऐसी

शत्रू चटावलेला नामोनिशाण नाही

 

वा मोरपीस गाली फिरते असेचि वाटे

उतरे अनंग खाली ह्या लेखणीस बळ ते''

 

तो र्‍या वागु लागे जेंव्हाच मी अशीही

उपहासगर्भ हासू विचलीत का करेची

 

अंधार भोवताली हसते कुणी असे का

अस्वस्थ मीच चित्ती लावून दीप पाही

 

दिसलीच शारदाम्बा स्मित मंद मंद ओठी

मी स्तब्ध मौन पाहे रम्य लावण्यमूर्ती

 

नयनीच नीर वाहे मति खुंटलीच माझी

कुब्जा कुरूप वेडी दिसले मलाच मीची

 

उतरली ऐट माझी पडलेच पादपद्मी

मातेच लेकरू मी मम दर्परोग हारी

 

माते नकोच काही चरणाविना तुझ्या गे

हे शब्द पोकळ फुके भक्ती त्यात राहे

 

ही लेखणी तुलाची वाहे अरुंधती ही

कर्तृत्त्व नाचि माझे माते कृपा तुझी ही

 

हसलीच माय माझी दिधली प्रसाद वीणा

झंकारता हृदी ती  येतेच काव्य जन्मा


----------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

sip your Coffee-

कडुनिंब 2