तमतृष्णा
तमतृष्णा
असे शांत तम गडद भोवती । दुलईसम वेढून मला
अनन्यभावे कुशीत त्याच्या । करते मी स्वाधीन मला
नकोत स्वप्ने सैरभैर ती । नीज कशी येईल
मला
नकोच गलका उशास माझ्या । नाद विसंगत
जगताचा
नीज अशी येता ही उत्कट । देह लवंडे
भान न त्या
निद्रादेवी कुशीत घेता । गाढ झोप लागेचि मला
रवी घेऊनी रजा म्हणे मज । दिन एक अजुन
हा मावळला
संध्या तारा म्हणेचि हसुनी । भेटू पुढच्या
मुक्कामा
खिडकी मधुनी चंद्र डोकवत । स्मित वदनाने
वदेचि हा
केसांमधुनी हात फिरवुनी । असशिल दमली, झोप जरा
निरव रवाचा आकाशीच्या । श्रुतीच घेती शोध पुन्हा
आले होते त्या गावाचा
। मार्ग दिसू लागे मजला
ओठीचे हरिनाम विरावे । तमात अलगद हळूच
ह्या
नजर विरावी तमी दाट ह्या । घेत शोध अदृश्याचा
अपार शांती शोषुन घेवो । मंद मंद रव
हृदयाचा
आस लागली पापण्यांस ही । उतरावे खाली
आता
झंझावातचि आयुष्याचा । म्हणे कुठे टेकवु
माथा
उफाळते वेगाने उत्कट
। सर्वांगी ही तमतृष्णा
--------------------------------------
लेखणी अरुंधतीची -
Comments
Post a Comment