कवडसा
कवडसा
येइ कुठुनसा एक
कवडसा
काळोखातचि किति
लहानसा
असेल नखभर त्याची
व्याप्ती
परि आकर्षित करे
कशी ती
ओघळला का असेल
मोती
चमकदार का पडली
शुक्ती
एक विलक्षण ओढ
लागली
तमी दिसे हे काय
खालती
काय सांडले
जमिनीवरती
हाताने चाचपडे
धरा ती
हाताला ना लागे
काही
परी कवडसा
बोटांवरती
छिद्रातुन मज हसे
चंद्र तो
भेटाया तुज आलो होतो
अंधारातच उचल
लेखणी
चंद्रकांति तव
बोटांवरती
…………………
लेखणी अरुंधतीची-
Comments
Post a Comment