नवीन वर्ष
नवीन वर्ष
उजाडत असताना निळ्या
आकाशातून पांढर्या शुभ्र बगळ्यांची माळ इंग्रजी उलट्या V अक्षरासारखे किंवा बाणाच्या
टोकासारख्या आकारात शांत, दृढतेने लपलप पंख हलवत चाललेली दिसली. सर्वात पुढे त्यांचा
नेता सर्वांना मार्गदर्शकाचं काम करत होता. वाटलं हेच तर नवीन
वर्ष! बाणाच्या टोकाची एक रेघ भूतकाळाच्या --- सरत्या वर्षाची तर बाणाच्या पात्याच्या
दुसर्या बाजूची रेषा येणार्या भविष्य काळाचे प्रतिक! त्यांना जोडणारा सर्वात पुढे
असलेला नेत्याचा ठिपका हा आजच्या--- आत्ताच्या क्षणाचं----वर्तमानाचं प्रतिक !
बलाकमाला वर्षांची ही
। उडत राहते सदा
काळरूप ह्या नभात लवलव
। विहरत जाते सदा
सरत्या वर्षांची ह्या
उमटे । सुदीर्घ रेखा नभी
येणार्या वर्षांची जुळते
। लेखा त्यासी दुजी
एकचि क्षण तो वर्तमान
हा । सांधे लेखा दोन
गतीमान हे नव संवत्सर
। बांधे भूत भविष्य
भूत भविष्याच्या दो पाखा
। सद्य क्षणचि नेता
उडत चालला थवा मनोहर
। बलाक-माले-समा
कुठून आली, कुठे चालली । कळे न
कोणा कधी
वर्तमान हा कुठे चालला
। दिशा घेत कोणती
अज्ञाताचे लक्ष्य भेदण्या
। शर जातसे कोठे
माहित नाही कोणासी त्या
। नाव धनुर्धराचे
परि उत्साहित होती सारे
। पाहुन त्याची गती
नयनरम्य ती बलाकमाला
। हर्षित करिते मनी
---------------------------------------
सुहृदहो ,
आपल्या सर्वांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा.
आपल्या सर्वांना उदंड आय़ुष्य, उत्तम आरोग्य, अपार आनंद आणि आपल्या आप्त जनांचा निरंतर
सहवास मिळो ही शुभेच्छा!
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
----------------------
किती घोकले नियम मनाशी । पहिल्या दिवशी
पडली माशी
नाही जुळले चार दिवसही । नाते त्यांचे नववर्षाशी
गजर वाजतो जरी उशाशी । मन हे म्हणते
झोप जराशी
सहा तास ना झोप पुरेशी । दुलई वाटे
हवी हवीशी
पहाटेस व्यायाम करावा, मना तूचि रे
नियम धरावा
करू उद्या हा निश्चय माझा, रोज नव्याने
करते पक्का
नव वर्षाचे असो नियंत्रण । मन ,बुद्धी अन सदा जिभेवर
अरबट चरबट नको म्हणे मी । प्रथमचि दिवशी
नको निबंधन
एक एक मग सरे दिवस हा । नव वर्षाचे
नऊ महीने
नववर्षातच नवा शोभतो । संकल्प नवा
संकल्पांची ऐशी तैशी । नववर्षाची होते
सरशी ।
पार्टी होती फारच खाशी । प्लम केकची
जराजराशी
नव्हती लागली झोप फारशी । लवकर जाग
येईल कैशी?
पोटा ठेऊ जरा उपाशी । दीक्षित दिवेकर
-------------------------------
काही पटले, काही केले, काही सुटले,
काही तुटले
काही सरले, काही नडले, काही अडले, पुरुनी
उरले
24 साली कामचि जे
बाकी त्याची पुढे सरकविते
वर्षभरातचि कामचि जे
काही भिजले, काही सुकले, काही विरले
क्षण काही ते उसवत गेले
क्षण सोमगुाचे
नववर्ष
Comments
Post a Comment