सूर्योदय
सू र्यो द य असे तेज ना दुजे पाहिले, खुजी सर्व तेजे धगधगणारी अनलप्रभाहि, त्या पुढती लाजे काय सोहळा काय दिमाखचि, रोज रोज गाजे अरुणध्वज हा क्षितिजावरती प्रवेशता वेगे -----1 क्षणाक्षणाला रंग साजिरे उषा रंगवीते रोज नव्या रंगानी नभ हे, उजळत नित जाते उत्कंठित मन नभपटलावर चित्र रोज पाहे जशी सजावट आज होतसे, उद्या तशीच नसे -----2 रंगहीन हे जग अंधारे, रंगत जाई न्यारे नव रंगानी सजून अवनी, सज्ज स्वागतास्तवे पायघड्यांस्तव उलगडले जणु गालिचे मखमली सोनवर्ख सजवितो पाकळ्या गुलाब गुलबक्षी ----- 3 ऋतूप्रमाणे पुष्प कमानी नव्या नव्या सजती मोहक सुंदर धुंद परिमळे अलि गुंजन करिती स्वागत गीते रोज नवनवी, भाट रवीचे गाती राहति गुंजत स्वर मधुर सुखे रोज आसमंती ----- 4 सप्तरंगि हे तुरंग अबलख, रथ घेऊन येती रथी बैसला सहस्ररश्मी स्वामी जगत्पती प्रभा तयाची सहस्र योजन पसरे सोनेरी प्रतिभा हाची सुयोग्य परिचय प्रतिभावंतासी ----- 5 ---------------------------------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित- विश्वावसू ,चैत्र शु. तृतीया (गौरीची तीज) 31म...