Posts

पहिली कविता

Image
  प हि ली क वि ता जुलमी सत्ताधीश आतपी, लुटून नेई अवघी अवनी अश्रू सुकुनी गालावरती कोमेजुन मुखमंडल जाई --- ।। 1 ( आतपी – सूर्य, अवनी- पृथ्वी )   मरुद्गणांची साथ रवीसी लुटण्या वैभव धनसम्पत्ती धुळीत माखुन गेली अवघी वसुंधरा ती अती लाघवी --- ।। 2     निराधार त्या वसुंधरेसी उरे न त्राता जगती कोणी कढ दुःखाचे गिळता गिळता हृदय विदीर्ण शतखंडच होई --- ।। 3   आक्रमणाने पीडित वंचित अबोल झाली; खिन्न तिचे मन धरणी टाकी उष्ण उसासे सर्पिण जखमी जशी फुसफुसे --- ।। 4 विष भरल्या त्या उच्छ्वासांनी मरणाचे थैमान भोवती दुःखी होती मुले माणसे, पशू पक्षि द्रुम-लताचि खासे  --- ।। 5   अभाग्यास ना पुसे कुणीही त्यजति   जळत्या तरुसी   द्विजही दारिद्र्याचा येता फेरा चुकविति त्याला जिवलग साथी  --- ।। 6   अवचित येई झुळुक सानुली घाली  फुंकर  जखमेवरती  ‘‘मरणानंतर दुजे मरण ना’’ देई विश्वासाने ग्वाही --- ।। 7   ‘‘उरे न काही जेव्हा लुटण्या भय लुटण्याचे कशास चित्ता गळून पडता ...

दिव्यांची रांग

Image
  दिव्यांची रांग उत्तर भारतातल्या कोहरा ह्या भयंकर प्रकाराची उग्रता आणि व्याप्ती कमी होत, आपल्याकडे त्याची पातळी धुक्यावर थांबते. महाराष्ट्रातही घाटात, जंगलात, कोकणात, पहाटेच्या प्रवासात धुक्यात हरवलेले रस्ते मनाला छान वाटत असले तरी, गाडी चालवताना रस्त्याची जाणीवही पुसून टाकतात. डोळे असून अंधळे करून टाकतात. नेहमी खाली डोकावताना धडकी भरवणार्‍या दर्‍यांचे खड्डे बुजवून, माना वर करून बघायला लावणार्‍या उंचच उंच डोंगररांगांना बुडवून, ‘मी किती हिरवागार सुंदर’ म्हणणार्‍या उंच वृक्षराजीला पुसून टाकून, सूर्यालाही मुठीत बंद करून सगळ्या सृष्टीच्या अहंकाराला लिंपून घेणारं हे धुकं सर्वांना असून नसल्यासारखं करून टाकतं. ह्या दाट धुक्यात झेंडा घेऊन सैन्याच्या अग्रभागी चालणार्‍या बिन्नीच्या घोडेस्वारासारखी मिणमिणती दिव्यांची रांग सर्वाना  रस्त्याचा  अंदाज देत राहते. दिव्यांची रांग धुक्यात हरवली वाट शोधते दूर दिव्यांची रांग तटस्थतेने उभे पथावर दिनरात दिव्याचे खांब धुके लोळते रस्त्यावरती, जणू घेउनिया भांग अलगद पडते भूवर त्याचे जडावलेच प्रत्येकांग असीम महौदधीच्या येती लाटांवरती ला...

मायबोली-

Image
  मायबोली- तुझी तर्जनी माय आधार माझा तुझ्या संगती चालतो मार्ग सारा नसे माहिती तू मला घेऊनी गे कुठे चालली गाव तो कोणता गे   परी मागुती मी तुझ्या चालताना न शंका न भ्रांती न भीती मनाला गमे स्वर्ग माझ्याच आहे मुठीते कशाची कमी वाटते ना मनाते   किती शब्दलेणी मला घालुनीया सुशोभीत केले तुझ्या ह्या मुलाला कळावी कशी माउलीचीच माया करे माय ते गोड वाटे तयाला   अगे बोलतो बोबडे बोल मी जे जसे बोलवी तूच तैसे मुखाने कसा मीच निर्भीड गर्दीतही गे तुझा हात हाती धरोनीच चाले   परी माय गर्दीत सोडू नको गे तुझ्यावीण बोलू शके मी कसा गे जरी हात गेला सुटोनी कधीही पुन्हा लेकरा माय कैसी मिळावी   अगे माय माझी मराठी सुवर्णी अडे शब्द माझा तुझ्यावीण कंठी असे हात हाती तुझा जोवरी गे दिमाखात मी तोवरी बोलतो गे --------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित- 27 फेब्रु. 2025

उद्दिष्ट

Image
  उ द्दि ष्ट प्रवाहासवे वाहती काटक्या ह्या कुणी ह्या तरूच्या; कुणी त्या तरूच्या कुणी वाळलेल्या, कुणी मोडलेल्या गळाल्याच ज्या भार वृक्षास झाल्या ----- 1   तरू सोडता व्यर्थ झाले जिणे ते असो येथ वा तेथ बेवारसाचे जळाची दिशा, वेग वा भोवर्‍यांनी कधी वाहती वा किनार्‍यास येती ----- 2   न राहे तयांसीच उद्दिष्ट काही न अस्तित्त्व त्यांचे कुणा मान्य होई मतीला असे पायबंदी जळाची प्रवाही पडे त्या गती ना स्वतःची ----- 3   परी पाणपक्षीच चोचीमधूनी तयांसीच एकेक गोळा करूनी निवारा करी पाणवेलींवरी त्या जळी भासती बेटुली पाचुची ज्या ----- 4   तरंगे तरंगांवरी तो निवारा सदा ओंजळी घेऊनी पक्षिबाळा तयांच्याच छोट्या पदाने सुखावे पसाराच तो वाळल्या काटक्यांचा ----- 5   कशा पाणवेली, कुठे काटक्या त्या तिरस्कार ज्यांचा जगानेच केला नवा अर्थ त्यांच्या मिळे जीवनासी घडे देखणी काटक्यांची हवेली ----- 6 ------------------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित माघ कृ. चतुर्थी 16 फेब्रु.2025

महाकुम्भ

  महा कुम्भ मनात माझिया वसे, वसंत हा सदाकदा   जाहलेचि खोड जरठ, मोहरले हृदय सदा -----1   मुळांस वाळवी जरी, सुवर्णपालवी वरी मनात रत्नमाणकां, फुटेच कोवळी कळी-----2   जरी दिशा ओस ओस, पुष्पांचे डुलति घोस शर्वरी करे हताश, फुले मनी तरि प्रकाश -----3   मनी बहर उन्मादक, क्षण क्षण हो आह्लादक जीर्णशीर्ण देहकवच, हृदि झिरपे संजीवन -----4   जनन-मरण देहप्रथा , मना नसे जरा व्यथा न जुमाने मन देहा , वेगळीच असे कथा -----5   संतमत कुंभातुनी, थेंब एक निसटलाच त्यातुन कणिकाच एक, स्पर्शली मम मनास -----6   महाकुंभ स्नान हेच , अमृतमय होय हृदय संतसुमन परिमळ मी,  व्यापे हे अंतरिक्ष -----7 -------------------------------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित- माघ पौर्णिमा ( 12 फेब्रु. 2025)

भारंड

Image
  भारंड- नृत्य शिकणार्‍या मुलीने मला भ र तनाट्यम नृत्यातील "रुंडभारुंड"ची हस्तमुद्रा करून दाखली. आणि मला त्या काल्पनिक पक्ष्याचा फोटोही दाखवला. मला पंचतंत्रातील गोष्ट माहित होती. दोघींना  नवीन माहिती मिळाली. पक्षी   होता   एक   तयाचे   ।   नाव   म्हणे भा रं ड दोन पाय अन दोन पंख त्या । एकचि होते पोट होती त्यासी दोन शिरे अन । होत्या माना दोन दोन दिशांना तोंडे त्याची। करिती नित्य भांडण     सागरतीरी हिंडत होता । भक्ष्याच्या शोधात लाटांवरुनी तोच तरंगत । कुठलेसे आले फळ एक चोच ती पकडे फळ ते । रसाळ अन् आकर्षक पहिले मुख ते खाता वदले । स्वादिष्ट जणु अमृत   खा इन   अर्धे   देइन  अर्धे   ।   माझ्या   मीच   प्रियेस दुजे तोंड ते वदे तयासी । मजला ही दे घास रसाळ   फळ   ते   कणभर   मिळता   ।    शमेल   जिह्वालौल्य सुखदुःखे   ही   एक   आपुली   । तृप्ती अपुली एक   परि दुर्लक्षुन दुजास तोची । वागे तसा खुशाल फळ अर्धे ते खाऊन त्याने । दिले प...

पाठ फिरवलेल्या पावसास

  पाठ फिरवलेल्या पावसास     नको रे नको जाऊ सोडून मेघा । पुसोनी वनांच्याच आयुष्य रेघा जरा दावुनी ह्या धरित्रीस आशा । निघे काय गुंडाळुनी तूच गाशा   सुनीला सलीले अती सांद्र झाला । सुखावे धरा पाहुनी मेघमाला पहा सज्ज झाले तुझ्या स्वागताला । अणू रेणु आसूसला ह्या क्षितीचा     तुझे देखणे रूप अन् मस्त चाल । बघोनीच वेडावला हा निसर्ग जरा स्पर्शिता तू गिरीकंदरांना । जरा पाहता शुष्क ओसाड राना   पहा मोहरूनी कसे सर्व येती । फळालाच आली प्रतिक्षाच त्यांची परी सोड ही संगती चंचलाची । तया ना ठिकाणाच उच्छृंखलासी   अरे निर्दयी तू जरा ना पहाता । निघोनीच जासी बदलून रस्ता कशी लावुनी जीवनाचीच आशा । मुखी मृत्युच्या लोटसी का धरेला   पहा मख्मली पल्लवे कोमलांगी । किती कोवळे कोंब हे ताम्रपर्णी पहा टाकिती सर्व माना सुकोनी । पिकेही पहा वाकली ही अकाली   उसासे न का ऐकतो तू तयांचे । मुखे म्लान त्यांची तुला काय त्याचे करे पाणि-पाणीच हे जीव सारे । परी का दया ना तुला पाझरे रे   जरी सिंधुतूनी जला गोड घेसी । तयाच्याच क्षारा...