INCHCAPE ROCK मृत्यूचा कातळ

INCHCAPE ROCK मृत्यूचा कातळ माझी मैत्रिण विनयानी मला एक सुंदर कॅलेंडर भेट म्हणून दिले . श्री. भास्कर सगर हया अत्यंत निष्णात चित्रकाराने भारतातील विविध दीपस्तंभांची चित्रे त्यावर अत्यंत सुंदर चितारली आहेत. खूप आवडली मला ती दिनदर्शिका. माझ्या कॉम्प्युटर टेबलवर विराजमानही झाली लिहीताना सतत समुद्रात मार्गदर्शक ठरणारे ते दीपस्तंभ पहात असताना मला आपल्याला शाळेत असलेली INCHCAPE ROCK कविता आठवत होती. INCHCAPE ROCK हे Robert Southey ह्या1802 मधे प्रकाशित केलेले कथात्मक गीत (Ballad) आहे. स्कॉटलंडच्या पूर्व किनार्यापासून 18 कि.मि. वर समुद्राखाली वाळुचे किंवा प्रवाळाचे खडक आहेत. INCHCAPE ROCK म्हणजे ज्याच्यावर मधमाशांच्या पोळ्यासारखी षट्कोनी नक्षी आहे असे. असे खडक हे प्रवाळाचे असतात. पाण्याखाली असलेले हे खडक न दिसल्यामुळे अनेक जहाजं ह्या प्रवाळ खडकांवर आपटून फुटत. म्हणून तेथील अॅबरब्रॉथक हया मठाधीशाने त्यावर एक सतत सूचना देत राहील अशी एक घंटा लावून ठेवली. येथील सर राल्फ द रोव्हर नावाच्या एका समुद्र चाच्याने त...