चंद्रोदय
चंद्रोदय
निरभ्र शांत आकाशी
उगवला असे शशी
एक झुळुक शांतशी
शहारते काया कशी।
संपते भाषा इथे
परतती शब्द ही
ह्या घटीचे त्या घटी
जाय ओतले तत्क्षणी।
तो चंद्र नभी ना उगवतो
हा प्रकाश कोठला मनी
त्याचे हे प्रतिबिंब नव्हे
ह्रदयीच बिंब उतरले।
न राहिले माझीच मी
विश्व घटी साकारले
विश्वात मी मिसळुनी
विश्व होऊन पाहिले।
----------------------------
लेखणी अरुंधतीची-
Comments
Post a Comment