आधार भार वाटे
आधार भार
वाटे
आधार भार वाटे
तम हा उदार भासे
प्रत्येक श्वास माझा
मजला उधार वाटे
आता न धीर मजला
हरि हात तू धरी रे
झाले अधीर मन मी
संसार मोडला रे
नाती कधीच पडली
गळुनी कुठेच मागे
कवठासमान आता
चिकटे न देठही रे
कर्पूर जीवनाचा
उडुनी क्षणात
जावा
मागे न तो उरावा
कधि अल्प अंश माझा
हरि पुण्यनाम नौका
पाहेच वाट माझी
बसले तयात आता
हरिरूप राहिले मी
-------------------------------------
Comments
Post a Comment