कविता अनुक्रमणिका क्लिक करा आणि वाचा विविध तरू/ निसर्ग विविध विविध अनुवादित कुं द संक्रात वेल प्रियांगी / प्रियमोहर / ( Tabebuia rosea) उनाड बोर गगन चाफा / बूच जक रंडा / नीलमोहर शिरीषाची झोप बाभळ नवलाई तालतरू (ताड) रान केळ क दं ब के ळ माणिक मोहर गु गु लमोहर (गंधपाकळी) अमल तास मो ग री कडुनिंब 1 कडु निंब 2 गाणारे झाड - वठलेलं झाड अभि मन्यू क व ठ आंब्याचा बंगला आम्र योद्धा फ ण स चिं च मधु मालति कदंब तरु पारि जातक प ळ स शा ल्म ली जारूळ/ तामण कास पठार कां च न तुलसी विवाह बे शरमी सप्त पर्णी सोन चाफा शे वं ती फु ले ना र्सिस स -------------------- अंबर मणी एक प्रभात झुं ज थेंबु टला पिटुक खेकडा वार्याची छत्री से ल्फी निदा घ - किमया थं डी पान गळ पावसाचा थेंब पा व सा स आकाशाचे रंग चंद्रो दय हिरवा ऋतु कृष्ण चतुर्दशीची पहाट पा ऊ स- मि ठी पाऊस आणि ती - सुंदर झाले जग सगळे वा द ळ 1 वा द ळ 2 श्रा व ण नि र्झ र सू र्यो द य सू र्या स्त पावले उषेची गु ला बी घा...
वा द ळ 1 नसतेच वादळाला संस्कृती, परंपरा किंवा नातं ---! असतं ते चार असामाजिक तत्त्वांनी संधीचा लाभ घेत एकत्र येणं ! आणि---- जे मिळत नाही, --- जे तयार करता येत नाही, --- ते सगळ्यांनी मिळून ओरबाडणं! मला नाही तर -- तुलाही नाहीचं एक भणाण थैमान नुसतं, ओरबाडलेल्याचाही उपयोग करण्याची क्षमता नसणं ! आक्रमण, हिरावून घेणं, हीच धारणा --- हीच शिकवण ----! नसतच कुठलं सुजाणपण! असतो त्याला फक्त एकच डोळा सर्वांवर रोखलेला, हृदयात हलाहल आणि वरवर शांतीचा पुरस्कार करीत समृद्ध किनारे शोधणारा! तिथे थैमान घालण्यासाठी मनातून आसुसलेला ! नसतात वादळाला मुळं, पानं, फुलं, फळं ---, नसतच माहीत त्याला एकमेकांना अन्न-आधार देतं – गगनावरी वेलु चढवणं ! मूळांनी खोडाला, खोडानी फांद्यांना ---- फांद्यांनी पानाफुलांना सुखावणं ----सजवणं! परत पानांनी सगळ्यांना अन्न देत जगवणं नाहीच पटत वादळाला एकमेकांच्या -- खांद्यावर मान टाकून विसावणं ! नाहीच भावत त्याला शांतीप्रस्तावाचं बोलणं माहीत असतं त्याला फक्त मुंड्या मुरगाळणं! ...
कडु निंब 2 झरझर झरल्या पाउस रेघा त्यात उभा कडुनिंब पसरुन कर तो झेलत धारा होत असे बहु चिंब तरु लव लवता, वाकुन फांद्या, ओघळती जल थेंब झिलमिल जल ते वाहत जाता त्यात दिेसे प्रतिबिंब पवन पुसत जाई भिजलेले ओलसरी तरु अंग तिरिप क्षणभरी येत उन्हाची सोनसरीं सम रंग खुदु खुदु खुदु तो हासत फांद्या नाचवि वायुसवेच सुख सुख अजुनी काय म्हणावे हा तर श्रीधरसंग --------------------- लेखणीअरुंधतीची-
Comments
Post a Comment