खारुताई
खा रु ता ई शेवगा फुलावर येवो वा अंब्याला बाळ कैर्या लागोत खाली पडणारा पांढर्या पाकळ्यांचा सडा वा कैरीच्या सालांचा हिरवा चुरा वर बसलेल्या खारुताईंची वर्दी देऊन जाई. पोपटही कैर्यांवर ताव मारतांना झाडाखाली यथेच्छ सांडत, पण त्यांचा गप्पीष्टपणा घरातूनही कळत असे. खारुताईंची उपस्थिती फक्त वरतून अखंड भुरभुरणार्या सालं वा पाकळ्यांमुळेच कळे. आपण नजरेनी झाडवर खारूताईचा शोध घेऊ लागलो तर तीही तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी खाली वाकुन टुळुटुळु आपल्याकडेच पाहतांना दिसे. मधुनच तिचा शेपीचा गोंडा उडवतानाही तिचं तोंड अखंड चालू असे. जरा जरी धोका वाटला तर झुमझुम पळून जाई, एखादी वेल स्वतःला गुंडाळत झाडावर चढत जावी तशी तशी झाडाभोवती गिरक्या घेत वर चढणारी; खाली उतरणारी खारुताई आणि तिच्यापाठी तिचा पाठलाग करणारी दुसरी खारुताई हे नेहमीचं गोड वाटणारं दृश्य पहायला मला फार आवडायचं शेवगा लागला बहरू, सजला फुलांनी तरू धांदलीने वरखाली, लागली खारुताई फिरू इकडे तुरुतरु, तिकडे तुरुतरु, तोंड तिचे चालू, सारखे कुरुकुरु फुलांचा झुपका हातात धरुधरू, खाई कुरुकुरू, पाक...