माया
मा या - मार्कंडेय ऋषींनी भगवंताला प्रसन्न करून घेतले आणि भगवंताची माया पाहण्याची इच्छा व्यक्त केली. भगवंत हसले. तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. तेवढ्यात सोसाट्याचा भीषण वारा सुटला. मुसळधार पाउस पडून नद्यांना पूर आला. सर्व जग त्या प्रलयात बुडते की काय असे वाटत असताना एका लाटेच्या तडाख्यात मार्कंडेयही वाहून गेले. नाकतोंडात पानी शिरत असतानाच महापुरात एक वडाचं झाड निश्चल उभे होते. त्याची पारंबी मार्कंडेयाच्या हाती आली. प्राणसंकट भयाने मार्कंडेय ऋषी ती पारंबी धरून कसेबसे जीव वाचवून उभे असता त्यांना त्या वडाच्या पानावर एक छोटासा बालक पायाचा अंगठा मुखात घालून आनंदाने खेळतांना दिसला. इतक्या भीषण प्रलयात हसणार्या त्या बालकाकडे ते मन हरपून पहात असताना त्यांना एक अजब गोष्ट दिसली. त्या शिशुने श्वास घेताच सारे विश्व त्याच्या श्वासासोबत त्याच्यात सामावले जात होते. तर त्याच्या उच्छ्वासासवे सारे विश्व परत बाहेर येत होते. ‘ अघटितघटनापटीयसी माया’ अशक्य असेल ते शक्य करून दाखवते ती माया पाहून मार्कंडेय ऋषी अचंबित झाले ‘‘वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्म...