Posts

Showing posts from January, 2025

पाठ फिरवलेल्या पावसास

  पाठ फिरवलेल्या पावसास     नको रे नको जाऊ सोडून मेघा । पुसोनी वनांच्याच आयुष्य रेघा जरा दावुनी ह्या धरित्रीस आशा । निघे काय गुंडाळुनी तूच गाशा   सुनीला सलीले अती सांद्र झाला । सुखावे धरा पाहुनी मेघमाला पहा सज्ज झाले तुझ्या स्वागताला । अणू रेणु आसूसला ह्या क्षितीचा     तुझे देखणे रूप अन् मस्त चाल । बघोनीच वेडावला हा निसर्ग जरा स्पर्शिता तू गिरीकंदरांना । जरा पाहता शुष्क ओसाड राना   पहा मोहरूनी कसे सर्व येती । फळालाच आली प्रतिक्षाच त्यांची परी सोड ही संगती चंचलाची । तया ना ठिकाणाच उच्छृंखलासी   अरे निर्दयी तू जरा ना पहाता । निघोनीच जासी बदलून रस्ता कशी लावुनी जीवनाचीच आशा । मुखी मृत्युच्या लोटसी का धरेला   पहा मख्मली पल्लवे कोमलांगी । किती कोवळे कोंब हे ताम्रपर्णी पहा टाकिती सर्व माना सुकोनी । पिकेही पहा वाकली ही अकाली   उसासे न का ऐकतो तू तयांचे । मुखे म्लान त्यांची तुला काय त्याचे करे पाणि-पाणीच हे जीव सारे । परी का दया ना तुला पाझरे रे   जरी सिंधुतूनी जला गोड घेसी । तयाच्याच क्षारा...

पोलादी मनगट माझे

  पोलादी मनगट माझे   दुःखाने पिचलो होतो मी शोधित होतो आधार पण पदरात पडल्या नुसत्याच गोठविणा र्‍या नजरा थंडगार   मिळाले मला खूप सारे सद्वर्तनाचे धडे नवे उपदेश तेही कोरडे विसरलोच त्यांच्यापुढे रडे मी माझे सारे     नको उपदेश कोरडे जपा तुम्ही तुमचे सोने विश्वास तो वाळुचे किल्ले बसलो धरून माझे डोके मी उद्विग्न मनाने   नको मला सखे सोबती नको तुमची प्रवचने नको उपदेशामृत काढे पोलादी मनगट माझे सोबत माझ्या आहे   देईल मला साथ नक्की ते माझ्याही अंतापर्यंत करील पार दुःखातून आणि पोचवेल मला त्या यशोमंदिरापर्यंत   “ लक्ष्मीः वसति हस्ताग्रे हस्तमध्ये सरस्वती हस्तमुले तु गोविन्दः ” माझी श्रद्धा दृढतर !!   दैवाला नमवून आज दैव बनले माझे दास कणखर हा माझा हात पण मन मात्र हलकं अगदि पिसासारखं !!   काढलं यांनीच खेचून निराशेच्या या गर्तेतून उभारी मनाला देऊन अन्न वस्त्रे देऊन किती वारं...